राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. बुधवारी कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधीमंडळाच्या पाय-यांवर विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात धक्काबुक्की झाली.
अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
विधान भवनाच्या पाय-यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पाय-यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावले असल्याचेदेखील म्हटले आहे.
विधीमंडळ परिसरात सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर. अमोल मिटकरी- महेश शिंदेंमध्ये धक्काबुक्की #vidhanbhavan #MonsoonSession2022 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/vDF0Nx7kWr
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 24, 2022
( हेही वाचा: न्यायालयापेक्षा पालिका सर्वोच्च आहे का? राणेंच्या बंगल्याबाबत महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल )
काय म्हणाले अजित पवार ?
या गोंधळाच्या काहीच मीनिटे आधी बोलताना, विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांनी एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. त्यामुळेच त्यांच्यातील काही आमदार बुधवारी विधीमंडळातील पाय-यांवर आलेत. त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झाले आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community