राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा

85

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. खार येथील फ्लॅटच्या संदर्भात न्यायालयाकडून अर्ज करण्यास 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत मुंबई महानगपालिकेला कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुढील आदेशापर्यंत कारवाई नाही

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे मुंबईतील खार येथील निवासस्थानाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे, सांगत मनपाने दोनदा नोटीस बजावली. 15 दिवसांत बांधकाम पाडले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला होता. याविरोधात राणा दाम्पत्य न्यायालयात गेले होते. आता न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला आहे. तसेच, पुढली आदेशापर्यंत कारवाई न करण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

( हेही वाचा: ओबीसी मोर्चादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील, पडळकर, दरेकर, गिरीश महाजन पोलिसांच्या ताब्यात )

नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस

28 मे रोजी खासदार नवनीत राणा नागपुरात हनुमान आरती करणार आहेत. त्यावेळेस नागपुरात राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन होणार आहे. नवनीत राणांच्या हनुमान चालिसा पठणादरम्यान, त्या मंदिरात राष्ट्रवादी महागाई विरोधात आंदोलन करणार आहे, त्यामुळे खासदार नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस असा सामना रंगणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.