मुंबईमध्ये आता मनसे आणि शिवसेनेमध्ये पोस्टर वाॅर सुरु झाले आहे. कारण, राज ठाकरे यांच्या मनसेला शिवसेनेकडून पोस्टरमधून टोला लगावण्यात आला आहे. मनसेच्या बदलत्या भूमिकेवर बोट ठेवण्यासाठी या पोस्टरचा वापर करण्यात आला आहे. शिवसेनाभवनाबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहे.
हे पोस्टर शिवसेनेकडूनच लावण्यात आल्याची कोणतीही माहिती नाही. तसेच, या पोस्टरवर कोठेही शिवसेनेने हे पोस्टर लावल्याचा उल्लेख केलेला नाही. राज ठाकरेंच्या ज्या भूमिका कशा बदलत जातात हे दाखवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली गेल्याचे बोलले जात आहे.
असे आहे पोस्टर
या पोस्टरमध्ये काल, आज आणि उद्या असे म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. सुरुवातीला राज ठाकरेंचा फोटो ज्यात मुस्लिम धर्माची टोपी घातली आहे. तो लावण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच पुढच्या काॅलमध्ये हनुमान असे लिहिण्यात आले आहे आणि आता उद्या राज ठाकरेंची काय भूमिका असणार आहे. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा तिसरा काॅलम ठेवण्यात आला आहे.
( हेही वाचा: एकाच पक्षाच्या नेत्यांना दिलासा कसा मिळतो? सोमय्या प्रकरणावर राऊतांनी व्यक्त केला संताप )
मनसे काय उत्तर देणार
त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे तसेच त्यांच्या भूमिकांचे चित्र दर्शवणारे हे पोस्टर शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आले आहे. काही वेळातच हे पोस्टर हटवले गेले असले, तरी आता शिवसेना आणि मनसे वाद शिगेला गेल्याचे या पोस्टरबाजीतून समोर येत आहे. त्यामुळे मनसेकडून या टीकेला कसे प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.
Join Our WhatsApp Community