NCP : घड्याळ कोणाच्या हातावर बांधलं जाणार? निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

112
NCP : घड्याळ कोणाच्या हातावर बांधलं जाणार? निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अधिकारावरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील भांडणाचा आता शेवट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खरे अध्यक्ष नेमके कोण आहेत? आणि कुणाचा शब्द अंतिम मानला गेला पाहिजे? आज म्हणजेच सोमवार ९ ऑक्टोबर रोजी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्वाचा

राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) आजचा म्हणजेच ९ ऑक्टोबर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या आज पार पडणार आहेत. एक म्हणजे, आमदार अपात्रतेच्या संदर्भात शरद पवार गटानं एक याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे आज नेमकं घड्याळ कोणाच्या हातावर बांधलं जाणार हे निश्चित होणार आहे.

(हेही वाचा – Election Commission : निवडणूक आयोग लवकरच ‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार)

शुक्रवार म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत अजित पवार (NCP) गटाने युक्तिवाद करताना, शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला, असा आरोप करत परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करत होते, असा आरोप केला होता. तर शरद पवार गटाने पक्षाचं चिन्ह गोठवू नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या दोन्ही सुनावणींकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? : सुप्रिया सुळे

निवडणूक आयोगाचा पेपर आधीच फुटला असून पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? असा सवाल सुप्रिया सुळे (NCP) यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांमागेदिल्लीतील अदृश्य शक्तींचा हात असल्याचा घणाघातही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.