महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज – PM Narendra Modi

43
महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज - PM Narendra Modi
महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज - PM Narendra Modi

महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे, असा माझा विश्वास आहे. “विकसित महाराष्ट्र, विकसित भारत” (Developed Maharashtra, Developed India) हे उद्दिष्ट आपण सर्व मिळून साध्य करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी (29 सप्टेंबर) दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण झाले. त्यानिमित्त ते बोलत होते. (PM Narendra Modi)

मोदी पुढे म्हणाले, “गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रातील युवावर्गासाठी आज मोठी शक्ती बनत आहे”. आधुनिकीकरण देशाच्या मूलभूत तत्वांवर आधारित असले पाहिजे आणि भारत आपला समृद्ध वारसा पुढे नेत आधुनिक आणि विकसित होईल. भविष्याच्या दृष्टीने सज्ज अशा पायाभूत सेवासुविधा आणि विकासाचे लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि ज्यावेळी समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या यात्रेत सहभागी होईल तेव्हा ते प्रत्यक्षात साकार होऊ शकते. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसरा टप्प्यातील निधी जमा; तर काही बहिणींना अजूनही प्रतिक्षाच! )

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो (District Court to Swargate by Pune Metro Opning) विभागाचे उद्घाटन झाले. त्यामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण होत आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचा खर्च सुमारे 1,810 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 2,955 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी करण्यात आली. सुमारे 5.46 किमी लांबीचा हा दक्षिणेकडील विस्तार मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.

सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम (National Industrial Corridor Development Programme) अंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेस 20 किमी अंतरावर 7,855 एकर क्षेत्रावर पसरलेले बिडकीन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलेल्या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक आर्थिक केंद्र म्हणून यात प्रचंड क्षमता आहे. एकूण 6,400 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून तो तीन टप्प्यांमध्ये विकसित होणार आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Kaushalya Hospital Thane : कोण आहेत कौशल्य मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा?)

पंतप्रधानांनी सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन केले. या विमानतळामुळे संपर्क सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील आणि सोलापुरात जाणारे पर्यटक, तिथले व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी ते अधिक सोयीचे होईल. सुमारे 4.1 लाख प्रवाशांना (वार्षिक) सेवा देण्यासाठी सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. भिडेवाडा (Bhidewada Pune) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.