विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तर दुसरीकडे मविआला जोरदार धक्का बसला. त्यातच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या ६५ टक्के आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यातही ११८ म्हणजे ४१ टक्के आमदारांविरोधात विविध पोलिस ठाण्यात हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (Assembly election results)
( हेही वाचा : Mohammed Shami : मोहम्मद शमीला कायम का नाही ठेवलं, गुजरातचे प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितलं?)
निवडणुकीच्या निकालानंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचच्या ताज्या अहवालानुसार निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी (निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार) ६५ टक्के म्हणजे १८७ उमेदवारांवर विविध स्वरुपांचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भाजपाच्या (BJP) १३२ पैकी ९२ आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या (Shiv Sena) ५७ पैकी ३८ आमदारांवर आणि राष्ट्रवादी (अ.प) पक्षाच्या ४१ पैकी २० आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच शिवसेना (उबाठा) (Shiv Sena- UBT) पक्षाच्या २० पैकी १३ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या ९ आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीतील पाच आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. (Assembly election results)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community