काजूबोंडे, मोहाच्या दारूला सरकारने दिला विदेश मद्याचा दर्जा

177
ठाकरे सरकारचा वाईनची विक्री सुपर मार्केटमध्ये करण्यास परवानगी देण्याचा निर्णय वादात सापडला असताना आता देशी दारूला प्रोत्साहन देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. बुधवारी, २० एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काजूबोंडे, मोहाच्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ठाकरे सरकारला पुन्हा टीकेला सामोरे जावे लागणार असे दिसत आहे.

दारूची विक्री वाढवण्यासाठी निर्णय

काजू आणि मोहाची फुले यांच्यापासून बनणाऱ्या दारूला याआधी देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात मिळणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही ६०० कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल, असा राज्य सरकारचा मानस मानस आहे. तसेच काजूबोंडे, मोहाफुले यापासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दारूची दुकाने मोठी होणार

मद्य विक्री करणाऱ्या  दुकानांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. इलाईट आणि सुपर प्रिमियम असे दोन गट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जी छोटी दुकान आहेत ते आपला दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकतात. 600 चौरस फुटांपर्यंत वाढवू शकतात तर सुपर प्रिमियम 600 चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे. महसूल वाढवण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  महसूल वाढीसाठी  एफएल-2  परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. .

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 

  • शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता
  • जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय
  • मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरीवली) येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील 30 वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय
  • तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय
  • पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.