एकनाथ खडसे गेले अमित शहांच्या भेटीला, चर्चेला उधाण

भाजपाच्या परिघातून लांब फेकले गेलेले एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी आहेत, तरीही खडसे शुक्रवारी, २३ सप्टेंबर रोजी चर्चेत आले. कारण खडसे त्यांच्या सुनेसोबत दिल्लीला भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले, त्यामुळे चर्चेला उधाण आले. एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्यातील चर्चेमागचा सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे याच विषयावरुन एकनाथ खडसे हे भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

चर्चा फोनवरून झाली 

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली असल्याचा दावा केला होता. दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांमुळे एकनाथ खडसे हे भाजपात जाणार की काय अशाही चर्चा आता सुरु झाल्या आहेत. यावर रक्षा खडसे यांना विचारले असता, काही जण याविषयाचे राजकारण करत असून खडसे राष्ट्रवादीतच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते भाजपात परत येणार का, याबाबत कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांची अमित शहांची भेट झाली का, याबाबत खासदार रक्षा खडसे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, अमित शहांची भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि मी दिल्लीत गेले होते, मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे अमित शहांची भेट झाली नाही. मात्र यानंतर एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली, असे त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here