माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. तर अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. पण शुक्रवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना आपल्या सध्याच्या पदाचा विसर पडल्याचे दिसले पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले.
‘मी राज्याचा उप…’
शुक्रवारी बारामतीत असताना अजित पवार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. त्यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना, ‘मला त्याबाबत जास्त माहिती नसून मी सध्या दौ-यावर आहे. मी जेव्हा त्याठिकाणी जाईन आणि तेव्हा नीट माहिती घेईन आणि मगच बोलेन’, असे म्हटले. पण हे बोलत असतानाच अजित पवार चुकून आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असल्याचे म्हणणार होते. पण त्यांनी वेळीच स्वतःला सावरले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते असा आपला उल्लेख केला.
(हेही वाचाः मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी दरेकर ‘पुन्हा आले’! महाविकास आघाडीला धक्का)
दरम्यान, विरोधी पक्षनेते हे सध्या हे राज्याच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. शुक्रवारी त्यांनी आपला मतदारसंघ बारामतीला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
Join Our WhatsApp Community