भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री शेजारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे सर्व सरकार आणि पोलिसांच्या भरवशावर चालले असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आमचं तोंड बंद होणार नाही
राज्यात सध्या सरकारच्या भ्रष्टाचारावर कोणी काही बोललं तर त्याला जीवे मारण्याची प्रवृत्ती दिसत आहे. पण अशा प्रवृत्तीला आम्ही केरळ, पश्चिम बंगालमध्ये घाबरलो नाही तर महाराष्ट्रात घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. दोन-तीनशे लोकांनी एकावर हल्ला करणं हे सगळं पोलिस आणि सरकारच्या भरवशावर चाललं आहे. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध तर आहेच, पण अशाप्रकारे हल्ले करुन आमचं तोंड बंद होणार नाही, भ्रष्टाचा-यांचा भ्रष्टाचार आम्ही काढणारच, असं फडणवीस यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितलं आहे.
(हेही वाचाः “…तो मला मारण्याचा कट होता”, शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर कंबोज यांची पोलिसांत तक्रार)
मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे.
महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही@mohitbharatiya_— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2022
कंबोज यांचं ट्वीट
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. या प्रकारानंतर मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये कंबोज यांनी तक्रारीची प्रतही दिली असून ते ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यावर काल जो हल्ला झाला, तो मला ठार मारण्याचा कट होता. मुंबई पोलिसांत मी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी असेल. जर मला घाबरवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत असेल तर मी सांगू इच्छितो की, मी तुम्हाला घाबरत नाही.
(हेही वाचाः राणा दाम्पत्यांना नोटीस, मग शिवसैनिकांना का नाही?)
Join Our WhatsApp Communityमेरे ऊपर जो कल हमला हुआ वो मुझे जान से मारने की एक साज़िश थी !
मुंबई पुलिस को मैंने शिकायत दर्ज कराई हैं और मेरी माँग हैं इसपे FIR दर्ज कर दोषी लोगों पे जल्द से जल्द कार्रवाई करे !
अगर मुझे डराने का काम महाराष्ट्र सरकार कर रही है तो मैं बताना चाहता हूँ मैं तुमसे डरता नहीं हूँ ! pic.twitter.com/nIPoMjMTFz— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) April 23, 2022