महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी त्यांच्या सागर निवासस्थानी मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावरुन भाजप कडून ठाकरे सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केली. त्या टीकेला आता फडणवीसांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.
मी चौकशीला सामोरा जाईन, असे मी निर्भीडपणे सांगितले होते. पण संजय राऊत हे स्वतः घाबरत पत्रकार परिषद घेतात आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका करतात. त्यांच्यात चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत आहे का, असा थेट सवाल करत फडणवीसांनी राऊतांना आव्हान केले आहे.
(हेही वाचाः ‘कितीही प्रयत्न केला तरी मला गोवू शकत नाही!’ फडणवीसांचा सरकारला इशारा)
काय आहे राऊतांचे ट्वीट?
देवेंद्र फडणवीसांची पोलिसांनी केलेल्या चौकशीवरुन राज्य सरकार हे सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. त्यावरुन संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजप नेत्यांना प्रत्त्युत्तर दिले. कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना राजकीय सूडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो, कायद्यापुढे सगळे समान आहेत, मग हा तमाशा का?, असे म्हणत राऊतांनी भाजपवर ताशेरे ओढले.
कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
(हेही वाचाः का झाली फडणवीसांची चौकशी? गृहमंत्र्यांनी दिले उत्तर)
संजय राऊत हे बोलू शकतात का?
यावर प्रत्त्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना थेट आव्हान केले आहे. मी स्वतःहून चौकशीला हजर राहणार असल्याचे सांगितले. पण संजय राऊत मात्र रोज घाबरत पत्रकार परिषद घेऊन, केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करत आहेत. पण मला कुठेही चौकशीला बोलवा, मी यायला तयार आहे, असे मी पोलिसांना सांगितले. संजय राऊत यांच्यात हे बालण्याची हिंमत आहे का?, असा खोचक सवाल फडणवीसांनी केला आहे.
(हेही वाचाः संजय राऊत तुरुंगात जाणार? राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?)
Join Our WhatsApp Community