केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली असून, या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कॅबीनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
अभिनंदन @AUThackeray साहेब.. pic.twitter.com/SaupFr4tRJ
— Rajesh Kshirsagar (@Rajesh9099) August 12, 2020
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब,” असं ट्विट करत या नियुक्तीबद्दल आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community