राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निहाय आपली तयारी करण्यात मग्न आहेत. महायुतीला लोकसभेला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. त्यानंतर आता महायुतीने देखील आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करण्यार असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. (Maharashtra Politics)
(हेही वाचा – Cabinet Meeting: दुग्ध विकासाला गती मिळणार! दूध उत्पादकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय)
महायुतीच्या माध्यमातून युतीमध्ये असलेले सर्वच पक्ष आपापले वेगवेगळे सर्वे करून सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आधार घेतला जात आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये लोकसभेला झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत याचाही काटेकोर प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या विधानसभेला समोर ठेवून लवकरच महायुती आपल्या काही जागांच्या उमेदवारांची घोषणा गणेश चतुर्थी नंतर तात्काळ करणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या २५ उमेदवारांची यादी, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी गटाची २५ उमेदवारांची यादी तर भाजपाकडून ५० उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. यामुळे लोकसभेला उमेदवारांची घोषणा करण्यास झालेल्या दिरंगाईमुळे प्रचाराला वेळ अपुरा पडला होता. ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून उमेदवारांच्या घोषणेमध्ये तरी महायुती आघाडी घेणार आहे असे चित्र दिसत आहे. (Maharashtra Politics)
महायुतीमध्ये झालेल्या समन्वयांच्या बैठकीमध्ये निवडून येण्याची क्षमता ज्या पक्षाकडे असेल त्यांना त्या विधानसभेची उमेदवारी मिळेल हे सूत्र अवलंबले गेल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community