राज्यातील पोलिसांना मुंबईत हक्काचं घर मिळणार असल्याचे संकेत आहेत. मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. शिंदे सरकारने गणेशोत्सवात राज्यातील पोलिसांसाठी आनंदवार्ता दिली आहे. अशातच पोलिसांना हक्कांचं घर मिळावं यासाठी राज्य सरकारची नवी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत म्हाडा झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास या योजनांमध्ये २५ टक्के घर पोलीस दलासाठी राज्य सरकार आरक्षित करणार आहे.
(हेही वाचा – PMPML च्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्घाटन, 90 ई-बसेस सेवेत होणार दाखल)
राज्य सरकार पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी तीन टप्प्यात आराखडा तयार करून पोलिसांना घर देणार आहे. यामध्ये शिघ्र टप्पा, मध्यम मुदतीच्या योजना, दीर्घ टप्पा योजना असे तीन टप्पे असणार आहे.
शिघ्र टप्पा
म्हाडा झोपडपट्टी पुनर्विकास समूह विकास योजना अशा सर्व प्रकल्पामध्ये २५ टक्के घर पोलीस दलासाठी आरक्षित करण्यात येणार आहे.
मध्यम मुदतीच्या योजना
पोलिसांसाठी आरक्षित असलेल्या शासकीय/खाजगी जमिनीवरील विकास करून त्यातून पोलिसांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देणार आहे
दीर्घ टप्पा योजना
मेट्रो स्थानकांचा बहुउद्देशीय विकास करून तसेच एसटी महामंडळ आणि शहर परिवहन उपक्रमांच्या बस डेपो आणि बस स्थानकांच्या ठिकाणी भूखंडांचा विकास करून त्यामधून काही प्रमाणात पोलीस दलासाठी घर उपलब्ध करून देणार आहे.
Join Our WhatsApp Community