महिला सुरक्षितता, सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलीस अत्यंत जागरूक – गृहमंत्री

मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेबाबत समाधान

111

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज गुरूवारी फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनिटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे कौतुक

पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलीस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश याद्वारे समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी यनिमित्ताने व्यक्त केली.

(हेही वाचा – ट्रेनच्या प्रवासाला आता विमानाचा नियम, इतक्याच वजनाचं लगेज फ्रीमध्ये नेता येणार)

साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. १० सप्टेंबर २०२१ च्या मध्यरात्री एक ३२ वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही ११ सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्या आतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक केली होती. त्याच्यावर भा.दं.वि.च्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, ॲट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अवघ्या १८ दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.