अंडरवर्ल्डशी संबंधीत व्यक्तींच्या संपत्तीची यादी तयार करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना दिले आहे. त्यामुळे दाऊद, छोटा शकील, सलीम फ्रूट यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची संपत्ती रडारवर येण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – अमृता फडणवीसांना अर्वाच्य शब्द आणि शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक)
महाराष्ट्र सरकारने अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना राज्यातील अंडरवर्ल्डशी संबंधित सर्व लोकांच्या संपत्तीची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. गृहमंत्र्यांनी या यादीतील दाऊद इब्राहिम, छोटा शकील, सलीम फ्रूट आणि इतर अनेकांच्या मालमत्तांचा तपशील गोळा करण्यास सांगितले आले आहे.
NIA ने कोणाला केली अटक
रिअल इस्टेट व्यवसायात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांची नावे समोर येत आहेत. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांकडून वसुली करून पैसे पाकिस्तानला पाठवले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तेथून हा पैसा समाजकंटक आणि दहशतवादी कारवायांमध्ये वापरला जातो. अशाच एका प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सलीम फ्रूटलाही अटक केली आहे. याच प्रकरणात आरिफ भाईजान आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. हे सर्व छोटा शकीलचे नातेवाईक आहेत. या सर्व हालचाली पाहता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी पोलिसांना अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या संपत्तीचा तपशील गोळा करण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community