मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार आहे. शहरातील पाण्याचा पुरवठा, जलव्यवस्थापन आणि त्यासाठी आवश्यक प्रकल्पांच्या प्रगतीचा तपशील या चर्चेत हाताळला जाणार आहे. (Maharashtra Politic)
विशेष म्हणजे, या बैठकीदरम्यान पालकमंत्री पदांच्या फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पालकमंत्री पदांवर बदल होणार का, याकडे राज्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politic)
सह्याद्रीतील या बैठकीला वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे मंत्री हजर राहणार आहेत. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे आगामी काळात मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Maharashtra Politic)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community