बहुमत चाचणी पुढे ढकला; शिवसेनेची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वाढतच चालल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी शनिवारी आणि रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितले. या दरम्यानच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.

बहुमत चाचणीआधी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पण 2 जुलै रोजी विशेष अधिवेशनात होणा-या बहुमत चाचणीआधी या प्रलंबित याचिकेवर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शिवसेनेने ज्या 16 नाराज आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. त्यांना या बुहमत चाचणी मतदान प्रक्रियेत मतदान करण्यापासून रोखण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या याचिकेला नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्यावतीने देखील याचिका दाखल करत शिवसेनेच्या याचिकेला आव्हान देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here