“आमच्या विठ्ठलाला…”, राज ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटाचाही ‘बडव्यां’वर रोष

97

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना शिवसेनेतील अंतर्गत कलहांमुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे पर्यायाने मविआला चॅलेंज केले असून जवळपास ४० हून अधिक आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचे एक पत्र शिंदेंनी ट्वीट केले आहे. एकनाथ शिंदेंनी हे पत्र ट्वीट करताना एकनाथ शिंदे यांनी “ही आहे आमदारांची भावना”, असे कॅप्शन दिले आहे. या पत्रात लिहीलेल्या मजकूरात शिवसेनेच्या बंडखोर आमदार म्हणजेच शिंदे गटाचाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमाणेच बडव्यांवर रोष असल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटाचाही ‘बडव्यां’वर रोष

२७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडताना जनतेशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या भाषणात देखील विठ्ठलाचा उल्लेख केला होता. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की,  “माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या अजुबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्यांना दिडदमडीच राजकारण कळत नाही, त्यांच्यासाठी म्हणून मी आज या शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देतोय”.

शिंदे गटाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले 

आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय, असे म्हणत शिंदेगटातील बंडखोर आमदारांनी मुख्यपंत्राना लिहिलेल्या पत्राची सुरूवात केली. पुढे त्यांनी असे लिहिले की, आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या आणि विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवाववर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच सो कॉल्ड चाणाक्य-कारकून बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकार काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यावत आम्हाला कधीही थे प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात. पण आमच्यासाठी तर सहाव्या मळ्याचाही प्रश्न आला नाीही. कारण मुख्यमंत्री मंत्रालयात गेलाच नाही.

(हेही वाचा – ..जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, मी आणि माझे कुटुंब शिवसेना सोडायला तयार आहे)

मतदारसंघातील कामं, इतर प्रश्न, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायंचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनसात बंगल्यावर गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन चार लाख मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत होती. हे योग्य आहे का?, असा थेट सवाल शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.