सध्या सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी गुरुवार, १६ मार्च रोजी संपली, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना महत्वाचे वक्तव्य केले. राऊत म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या विरोधात येईल असे समजून आम्ही चाललो आहेत. आम्ही लढणारे लोक आहेत. त्यामुळे आम्ही आशा निर्णयाला घाबरत नाही.
चिन्ह आणि पक्षाचे नाव गेले पण आमच्याकडे ठाकरे नावाचा ब्रॅंड आहे. त्याच्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असेही राऊत म्हणाले. याशिवाय संजय राऊत यांनी यावेळेला अंधेरीच्या पोटणीवडणुकीचेही उदाहरण दिले आहे. पक्षाचे नाव बदलले, चिन्ह मशाल होते. त्यावर आम्ही निवडणुका लढलो आणि जिंकलो सुद्धा. त्यामुळे आम्ही लढणारे लोकं आहोत अशा कुठल्याही निर्णयाला घाबरत नाही असे म्हटले आहे. अलिकडच्या काळात सोशल मीडिया आहे, मीडिया आहेत. त्यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह पोहचायला वेळ लागत नाही असे म्हणत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच भाष्य केले आहे. त्यामुळे पुढील काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा कोणत्याही मंत्र्याच्या कारभारात ढवळाढवळ करू नका; उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्र्यांना निर्देश)
Join Our WhatsApp Community