महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crises) अखेर गुरुवारी, ११ मे रोजी निकाल लागला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाला दिला आहे. या निकालाचे वाचन गुरुवारी झाले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
(हेही वाचा – Maharashtra Political Crises : माझ्या शिवसेनेचा आदेश अंतिम असेल – उद्धव ठाकरे)
सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या (Maharashtra Political Crises) निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरले असल्याचं फडणवीस म्हणाले.
हेही पहा –
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सर्वोच्च न्यायालयाने (Maharashtra Political Crises) महाराष्ट्राबाबत दिलेल्या निकालाबाबत आम्ही पूर्ण समाधानी आहोत. निकालात ४-५ महत्त्वाचे मुद्दे आहेत. सर्वात आधी तर मविआच्या मनसुब्यांवर पाणी फेरत न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अपात्रतेच्या याचिकांबाबतचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलंय की अध्यक्ष आणि आयोगाला त्यांच्यासमोर येणाऱ्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आधी काही लोकांना शंका होती, त्याचं समाधान न्यायालयानं केलं असावं. अर्थात, ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असतील तर त्यांच्या शंकेचं समाधान झालं असेल. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra Political Crises
Join Our WhatsApp Community