शिवसैनिकांचे मेळावे अनेक, आदित्यची स्क्रिप्ट एकच

शिवसेनेचे फुटीर नेते एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांच्या परतीचे मार्ग बंद झाले आणि त्यानंतर शिवसेनेने पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली. यामध्ये आदित्य ठाकरे मरीन लाईन्स बिर्ला मातोश्री सभागृहात दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२चा मेळावा, कलिना व कुर्ला विधानसभा कार्यकर्ता मेळावा वाकोला ब्रिज पाटक टेक्निकल हायस्कूल, महाराष्ट्रातील सर्व नगरसेवकांशी संवाद, युवा सेनेची राष्ट्रीय कार्यकारीणी मेळावा, कर्जत, दादर आणि भायखळा आदी ठिकाणी झालेल्या मेळाव्यांमधील भाषणांमध्ये आदित्य ठाकरे यांची एकच स्क्रिप्ट असल्याचे दिसून येत आहे. मेळावे अनेक असले तरी आदित्य यांनी बंडखोरांचा समाचार घेताना केलेल्या भाषणांची स्क्रिप्ट एकच असल्याने ठाकरे कुटुंबांनी आपली रणनिती जाहीर स्पष्ट केली.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट

 • आता लढायचंच आहे आणि जिंकायचंच आहे
 • अशा लोकांना किती किंमत द्यावी
 • इथे ही टोळी सत्ताधारी पक्ष सोडून विरोधकांकडे गेली आहे
 • त्यांची पुढची वाट म्हणजे त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही. भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही.
 • मागचे दोन्ही बंड आपण पाहिले तेव्हा आपण जिंकलो आहोत
 • ह्दयावर आणि मनावर सत्ता गाजवणारे म्हणजे आपले मुख्यमंत्री…
 • तन मन लावणारे लोक आपल्याकडे हेत, प्राईस टॅग लावलेले नकोयत…
 • प्रत्येक पक्षाचा डोळा मुंबईवर आहे…
 • जी घाण होती ती निघून गेली, आता जे होणार ते चांगलंच होणार…
 • अनेकांना वर्षा सोडता येत नाही, अनेक जण मी पुन्हा येईन म्हणतात, अनेक जण भिंतीवर लिहतात…
 • आता निवडणूक लागल्या तर आपणच निवडून येणार…
 • बंडखोरांना माफी नाही…
 • ज्यांना जायचंय दरवाजे खुले आहेत…
 • त्यांना स्वत:ला आरक्षात बघायलाही लाज वाटेल अशी त्यांची परिस्थिती झाली आहे…
 • प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय शिवसेनेचाच होणार…
 • बंड ठाण्यात बसून मुंबईत बसून केला असता, महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले
 • मी निवडून आलोय ते शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे…
 • अडीच वर्षात ज्यांनी हिंदुत्वाचा चकार शब्दही काढला नव्हता…
 • धनुष्यबाण आपलाच राहणार…
 • बंडखोरी करत जे विकून गेलेत, त्यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवावी…
 • घोडेबाजार काय असतो तो बघतोय…
 • हम शरीफ क्या हुये पुरी दुनिया ही बदमाश हुयी…
 • आम्ही आहोत दिलवाले…
 • मी या खोटारडेपणाची चिरफाड करायला उतरलो आहे, तुम्ही देखील सोबत या…
 • बंड करायचं होते तर समोर येवू सांगा…
 • घाण गेली हे बरं झालं, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली, हे बरं झालं…
 • ठाण्यात दादागिरीने लोकांची मनं जिंकू शकत नाही…
 • सत्य यांच्या बाजूने असतं तर बंड केलं नसतं…
 • कुणीही मागे असले तरी महाराष्ट्र झुकणार नाही…
 • फुटीरवादी आमदार खोटे बोलतायत, ते आता शिवसेनेत राहू शकत नाही…
 • राजीनामा द्या आणि निवडणुकीला उभे रहात…
 • बंड केलं असं म्हणणार नाही, कारण बंड करायला हिंमत लागते…
 • रिक्षा चालक, पान टपरी चालवणाऱ्यांना मोठं केलं आपण…
 • आपल्याला धोका आपल्या लोकांनीच दिला
 • शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही
 • काही जण आमच्या संपर्कात आहेत…
 • विधान भवनाची पायरी चढू देणार नाही…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here