महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील मागील आठवड्याच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर या आठवड्यातील सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ही सर्वोच्च सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून याच आठवड्यात युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण होणार असल्याचे मंगळवारच्या सुनावणीत स्पष्ट झाले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवार अखेरपर्यंत दोन्ही बाजूंनी आपापले युक्तिवाद पूर्ण करावेत, अशी सूचना दिली. त्याप्रमाणे बुधवारी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली असून आता शिंदे गटाच्या वकिलांचा दहाव्या परिशिष्टसंदर्भातील एक दावा सरन्यायाधीशांनी फेटाळला आहे.
नीरज कौल यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, ‘दहाव्या परिशिष्टाचा संदर्भ घेतला आणि त्यानंतर जर विरोधी गटाने पक्षात असल्याचा दावा केला काय किंवा नवा पक्षाची स्थापना केल्याचा दावा केला काय, यामुळे काही फरक पडत नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तसेच पुढे चंद्रचूड म्हणाले की, तुम्हाला दिलेल्या तारखांनुसार २१ जूनपासूनच शिवसेनेत फूट पडल्याचे दिसत आहे.’
यावर कौल म्हणाले की, ‘शिवसेनेत फूट पडल्याचे आम्ही म्हटलेले नाही. पण बहुमत चाचणीचे आदेश दिल्यामुळे राज्यपालांचे काय चुकले’, असा प्रश्न कौल यांनी उपस्थित केला. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, ‘पक्षात फूट पडली. पण ज्या लोकांनी फूट पाडली ते पक्षात राहतील किंवा बाहेर पडतील. पण अशाही परिस्थितीमध्ये तो गट त्याच पक्षात राहून काम करू शकतो. तुम्ही ठाकरे गटाला अल्पसंख्य आणि शिंदे गटाला बहुसंख्य म्हणत आहात. मात्र, दहाव्या परिशिष्टानंतर त्याला काही अर्थ राहत नाही.’
(हेही वाचा – विधिमंडळाचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केला असेल तर योग्य ती कारवाई करा- अजित पवार)
Join Our WhatsApp Community