Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी झालीच तर कोरोनाबाधित अजित पवार आणि भुजबळ काय करणार?

84

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ हे कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने, गुरुवारी होणा-या बहुमत चाचणीला हजर राहणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे हे दोन्ही प्रमुख नेते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे गुरुवारी होणा-या आमदारांच्या शिरगणनेत हे दोन्ही नेते उपस्थित राहणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

….तर अजित पवार आणि भुजबळांना उपस्थिती राहता येणार

विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, आताच्या वैद्यकीय आधुनिक साधनसामग्रीचा आधार घेऊन, छगन भुजबळ आणि अजित पवार हे डाॅक्टरांच्या सल्ल्याने येऊ शकतात, आणि मतदान करुन तातडीने निघून जाऊ शकतात. संसर्ग होण्याची शक्यता नाही. परंतु, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला आणि राज्यसभेच्या निवडणुकीला परवानगी नाकारली होती. त्याच्या धर्तीवर त्यांना या बहुमत चाचणी मतदानात  उपस्थित राहून मतदान करता येईल याची शक्यता नाही, असेही कळसे यांनी सांगितले.

( हेही वाचा Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उरले आता ‘हे’ दोनच पर्याय )

मलिक आणि देशमुखांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान, पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी बहुमत चाचणी मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयात  धाव घेतली आहे. या याचिकेवर संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी परवानगी नाकारल्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालय बहुमत चाचणी मतदानात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी परवानगी देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.