देवेंद्र फडणवीस हे ‘रामसेतू’ आहेत

103

३० जून रोजी राजकारणात अचानक ज्या घडामोडी घडल्या त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वरिष्ठांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. त्यांच्यामागे अनेक योद्धे उभे होते. एकट्या हनुमानाने रावणाच्या लंकेला आग लावली. आग लावण्यामागे हनुमंतांचा एकच उद्देश होता, रावणाला त्याच्या भविष्याचं दर्शन घडवणं.

राजकारणात हनुमंत ठरले किरीट सोमय्या

मी रामाच्या पक्षातला एक अधिकारी आहे, जर मी लंकेला आग लावू शकतो तर खुद्द राम आल्यावर काय होईल? हा संदेश हनुमंताने दिला. रावणाला जर जिंकायचं असेल तर रावणाच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत म्हणून विभिषणाला स्वतःकडे वळवलं. विभिषण आल्यामुळे अर्धी लढाई रामाने जिंकली होती. आता सध्याच्या राजकारणात हनुमंत ठरले किरीट सोमय्या. त्यांनी वेळोवेळी विरोधी पक्षाचे भ्रष्टाचार पुराव्यासकट बाहेर काढले आणि त्यांनी विरोधकांना त्यांचं भविष्य दाखवून दिलं. तरी विरोधक आपल्याच मस्तीत जगत होते.

आता एकनाथ शिंदेंच्या रुपाने विभिषण त्यांना भेटला. एकनाथ शिंदेंच ठाणे हिसकावून घेण्याचा कट राष्ट्रवादी रचत होती. उद्धव ठाकरेंना ते दिसत होतं. पण त्यांनी स्वतःला पूर्णपणे शरद पवारांना समर्पित केलं असल्याने त्यांना त्यात गैर काही वाटलं नाही. शिंदे कधी ना कधी बाहेर पडणारच होते. तुम्ही माझं ठाणे हिसकावून घेत होता ना? मग आता मी तुमचं राजकीय अस्तित्वच हिसकावून घेणार, ही शपथ घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ते अमित शहांना येऊन मिळाले.

सर्वांच्या अग्रस्थानी देवेंद्र फडणवीस

या सर्वांच्या अग्रस्थानी होते देवेंद्र फडणवीस. स्वतः यशस्वी मुख्यमंत्री होते, पण केवळ वरिष्ठांच्या सांगण्यावरुन ते दोन पावले मागे गेले आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांना सरकारमध्ये राहायचं नव्हतं, सर्वोच्च पद भुषवल्यानंतर कोणाला खालचं पद घ्यायला आवडेल? पण तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. शिंदेंना मिळालेलं मुख्यमंत्रीपद हे बोनस आहे. त्यांना शिवसेनाप्रमुखपद हवं आहे. यातून असं दिसतं की ज्याप्रकारे रावणाच्या लंकेवर रामाने अधिकार सांगितला नाही, त्यचप्रकारे शिंदेंना त्यांचा मान दिलेला आहे.

पण रामसेतू उभारला गेला नसता तर वानर सैन्य लंकेपर्यंत पोहोचू शकलं नसतं. उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या फडणवीसांनी महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या हितासाठी ‘रामसेतू’ होणं स्वीकारलं. ते नसते तर या सगळ्या घडामोडी घडल्याच नसत्या. त्यामुळे फडणवीस हे सध्याच्या राजकारणातके ‘रामसेतू’ ठरले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.