शिवसेनेतील प्रबळ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, राज्यातील सत्तासंघर्ष सुरु झाला. सध्या राज्यात ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट निर्माण झाला आहे. आता याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेना शाखेतून एकनाथ शिंदेंचे छायाचित्र शिवसेना कार्यकर्त्यांनी हटवले, तसेच त्यांना शाखेत प्रवेश दिला नाही म्हणून शिंदे समर्थक 15 पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत.
( हेही वाचा Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी झालीच तर कोरोनाबाधित अजित पवार आणि भुजबळ काय करणार? )
…तर शिवसैनिक म्हणवून घेण्यात काय अर्थ
डोंबिवलीतील शिंदे समर्थक 15 पदाधिका-यांनी शिवसेनेतील पदांचे राजीनामे दिले. मध्यवर्ती शिवसेना शाखेतील एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हटवली होती, ही माहिती मिळताच शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम कार्यकर्त्यांसह शिवसेना शाखेत आले होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. त्यावरुन दोन गटात बाचाबाची झाली. ज्या शाखेत निष्ठेने 25-30 वर्षे शिवसैनिक म्हणून वावरलो त्याच शाखेत प्रवेश मिळत नसेल तर शिवसैनिक म्हणून घेण्यात काय अर्थ असा विचार करुन शिंदे समर्थकांनी पदांचे राजीनामे दिले.
Join Our WhatsApp Community