राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. नाराज आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. ३८ नाराज आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत मविआ सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा, दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग करत असल्याचा दावा शिवसेनेच्या नाराज आमदारांनी केला आहे.
…तर शिंदे गटाला मोठा झटका
नाराज आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने, याचिकेत ठाकरे सरकारने बहुमत गमावले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना 27 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत उत्तर द्यावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. हे 16 आमदार जर अपात्र सिद्ध झाले, तर शिंदे गटाला मोठा झटका बसणार आहे. त्यामुळे सोमवारी होणा-या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राऊतांनी व्यक्त केला विश्वास
काहीही झाले तरी रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत त्यांनी व्यक्त केला आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना महाराष्ट्राची माती माफ करणार नाही, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community