‘मविआ’ सरकारची आणखी एक खेळी, ‘शिंदे गटा’तील मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप

168

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय सत्तानाट्य सुरू आहे. एकनाथ शिंदेंचे बंड आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला गोंधळाची चर्चा देशभर होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, तब्बल आठ दिवसांनी शिवनेच्या बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्याची खाती काढून घेतल्याचे समोर आले आहे. शिंदे गटातील मंत्र्याची पद कायम ठेवले असून त्यांच्या खात्यांचे फेरवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आणखी एक खेळी केली असून बंडखोर नेत्यांची खातीच काढून घेतली आहे.

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहावी, यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

कोणाकडे कोणतं खातं?

गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री) – अनिल परब

एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री) – सुभाष देसाई

दादा भुसे (कृषी मंत्री) – शंकरराव गडाख

अब्दुल सत्तार (राज्यमंत्री, महसूल, ग्राविकास, बंदरे, खार जमिनी विकास) – प्राजक्त तनपुरे

उदय सामंत (उच्च तंत्र शिक्षण मंत्री) – आदित्य ठाकरे

राजेंद्र पाटील यड्रावरकर (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य) – सुभाष देसाई

बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण) – आदिती तटकरे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल

  1. शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती
  • संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण)
  • विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील

2. राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती 

  • विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण),
  • प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),
  • आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

3. अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती 

  • प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल),
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास),
  • आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती

  • आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण),
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार),
  • संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास),
  • दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.