एकनाथ शिंदें मुंबईत दाखल; राजभवनाकडे रवाना

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या विमानतळावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. त्यांचे काही समर्थक विमानतळ परिसरात आले आहेत. तसेच, पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता सुरक्षेच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड सुरक्षा देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे मुंबई विमातळावरुन रवाना होऊन, देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊन, नंतर राजभवनाकडे जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, पराग, प्रसाद लोढा आहेत.

( हेही वाचा: राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या संघर्षाचे असे काही प्रसंग )

आणि दिल्या घरी सुखी रहा

संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. तुम्ही बनवून दाखवा. त्यानंतर, आता किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की ईडी पिडी सगळे मागे लागल्या आहेत. म्हणून सर्व चालू आहे. जनता वेडी नाही. एकच सांगेन शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवून दाखवा आणि दिल्या घरी सुखी रहा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here