नव्या सरकारमध्ये भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रिपदं? एकनाथ शिंदे म्हणाले…

80

ठाकरे सरकार अल्पमतात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस सरकार पुनर्स्थापनेची वाट मोकळी झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. आज एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसे असेल अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याआधीच एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं ट्विट केले आहे.

(हेही वाचा – रस्ते घोटाळ्याप्रकरणी बच्चू कडूंना क्लीन चीट; फाईल क्लोज)

काय म्हणाले शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली असून मंत्रिपदं, खातेवाटप याविषयी एकनाथ शिंदेंनी ट्विट केले आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे ट्विट करून शिंदेंनी एकप्रकारे आवाहन केले आहे.

नव्या सरकारमध्ये मंत्रिमदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदं देण्यात येणार असून वेळेवर बदल केला जाऊ शकतो असेही सांगितले जात आहे. तर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कशा प्रकारे मंत्रिपदं असतील, याबाबत चर्चा सुरू देखील झाल्या आहेत. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती समोर आली नाही.

संभाव्य यादी अशी असण्याची शक्यता

कॅबिनेट

देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर

प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे

देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे

विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर

राज्यमंत्री

संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.