“बाळासाहेबांना अटक करणा-या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत?” शिंदेंचे नवे ट्वीट

168

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नाराज एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एक नवे ट्वीट केले आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणा-या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना, आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना विचारला असल्याचे, एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार; राऊतांनी व्यक्त केला विश्वास )

भुजबळांनाच्या मांडीला मांडी लावताना यातना नाही का होत

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत, म्हटले आहे की बाळासाहेबांना अटक करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत? या ट्वीटमध्ये म्हटले आहे की बाळासाहेबांना अटक केल्यानंतर, याबाबत विधानसभेत जाब विचारणा-या साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. शिंदे यांच्या या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.