राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढले; एकनाथ शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

148

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं ट्वीट शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि करत आहेत, असेही ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शनिवारी नोटीस पाठवण्यात येणार आहे. 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरु झाल्याचा शिवसेनेने दावा केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.