मोठी बातमी: एकनाथ शिंदे 30 जूनला मुंबईत येणार; बहुमताची करणार चाचणी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते  एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत एक मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुरुवारी 30 जून रोजी मुंबईत बहुमतासाठी येणार आहेत. 30 जूनला बहुमत सिद्ध होणार आहे. राज्यपालांनी महविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसामधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नाराज आमदारांना वारंवार परत येण्याचे आवाहन केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here