शिवसेनेत झालेलं बंड शरद पवार कसे काय मोडून काढू शकतील?

91

शिवसेनेत झालेलं बंड आता शिगेला पोहोचलं आहे. हे बंड मोडून काढायच्या ऐवजी बंड आणखी कसं चिघळेल याची काळजी संजय राऊत व्यवस्थित घेत आहेत. त्यांना शरद पवार यांचा आशीर्वाद आहे. आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना धमकी देत आहेत. हे सगळं ते शरद पवारांचा डोक्यावर हात आहे म्हणून करत आहेत.

( हेही वाचा : Maharashtra political crisis: शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली नोटीस)

सर्वांना असं वाटतं की शरद पवार हे सुपर हीरो आहेत. एव्हेंजर आहेत. म्हणून ते काहीही करु शकतात. अशि एक अंधश्रद्धा त्यांच्या भक्तांमध्ये आहे. त्यातील एक भक्त म्हणजे संजय राऊत. ज्यावेळी शिंदेंनी बंड केलं त्यावेल ठाकरे आणि राऊतांचा चेहरा पडलेला होता. आता सगळं संपलं असेच हावभाव दोघांच्या चेहर्‍यावर होते.

राजीनामा न देता भावनिक आवाहन द्यायला सुरुवात

उद्धव ठाकरे तर राजीनामा देणार होते. पण कदाचित शरद पवारांनी लगेच फोन केला असणार, यामुळेच त्यांनी राजीनामा न देण्याचं ठरवून भावनिक आवाहन द्यायला सुरुवात केलेली आहे, त्याच बरोबर शिवसैनिकांचं उपद्रवमूल्य दाखवायलाही सुरुवात केलेली आहे. त्यातून शिंदे समर्थकांचे कार्यलय फोडण्यात आले.

सर्वात गंमतीदार गोष्ट म्हणजे पक्ष फुटला उद्धव ठाकरेंचा, पण उद्धव ठाकरे काहीच करत नाहीत. त्यांनी संपूर्ण पॉवर ऑफ ऍटर्नी शरद पवारांना देऊन टाकलं आहे. आता आम्हाला वाचवा. हे असं झालं, की एक गेंडा मागे लागलाय म्हणून वाघाच्या गुहेत आश्रयाला गेले. शरद पवार कसे वाचवतील तुम्हाला? सुरुवातीला त्यांनीच शिवसेना मोठ्या प्रमाणात फोडली. मग भुजबळ असो, गणेश नाईक अशी अनेक नावे सांगता येतील.

…यापेक्षा दुसरा विनोद नाही

अशा शरद पवारांच्या हातात कमान देऊन उद्धव ठाकरे निश्चिंत झालेले आहेत. यापेक्षा दुसरा विनोद नाही. अरे वाघाच्या आश्रयाला गेलं तर वाघ खाऊन नाही का टाकणार? आता शरद पवार जितकं डॅमेज करता येईल, तितकं करणार आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांना वाचवण्यात कसलाच रस नाही. त्यांना आता त्यांचं हित पाहायचं आहे. या संकटातून स्वतःला कसं वाचवायचं यासाठी त्यांची खेळी सुरु आहे. म्हणूनच शिवसेनेत झालेलं बंड शरद पवार कसे काय मोडून काढू शकतील? हा प्रश्न उद्धव ठाकरेंसह कुणालाच पडलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.