महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सलग सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रवूड यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात येत आहे.
( हेही वाचा : सभापती की मंत्रीपद; राम शिंदेंचा नेम कुठे लागणार?)
सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
हे संपूर्ण प्रकरण संपवायचे आहे असे महत्त्वपूर्ण वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान केले आहे. शिंदे गटाने सुद्धा दोन दिवसांमध्ये आपला युक्तिवाद पूर्ण करावा असे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. सध्या ठाकरे गटाचे वकील अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि अॅड. देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. त्यानंतर शिवसेनेचा युक्तिवाद सुरू होणार आहे.
तसेच राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनीही दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडल्यावर पुढील आठवड्यात हा निकाल लागू शकतो असेही खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.
अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे युक्तिवाद
- महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिवसेनेकडून व्हीप जारी केला गेला असून आमच्या गटावर कधीही अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
- राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा, १० व्या सुचीतील अधिकारांचा गैरवापर करण्यात येत आहे.
- १० व्या सूचीनुसार राज्यपाल फुटीर गटाला मान्यता देऊ शकत नाहीत असा युक्तिवाद अॅड. कपिल सिब्बल यांनीही केला.