एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने आता बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचे मत मांडण्यास सांगितले आहे. या आमदारांनी जर आपली मते मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे. या आमदारांना सोमवारी 27 जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधी एकनाथ शिंदे आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
या 16 आमदारांना नोटीस
- एकनाथ शिंदे
- अब्दुल सत्तार
- संदीपान भुमरे
- प्रकाश सुर्वे
- तानाजी सावंत
- महेश शिंदे
- अनिल बाबर
- यामिनी जाधव
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
- बालाजी किणीकर
- लता सोनावणे
- सदा सरवणकर
- प्रकाश आबिटकर
- संजय रायमूलकर
- रमेश बोरनारे
Join Our WhatsApp Community