शिवसेनेचे प्रबळ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, राज्यातील सत्तासंघर्ष सुरु झाला. एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे.
सध्या राष्ट्रवादीमध्ये 53, काॅंग्रेस 44 आणि शिवसेनेकडे 16 असे संख्याबळ आहे. मविआ सरकारकडे असलेले हे संख्याबळ पाहता सरकार अल्पमतात आल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या विषयाची प्रतिष्ठा न करता, बहुमत चाचणी करुन सरकार कोसळल्यानंतर होणारा अपमान टाळणे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचे आकलन करुन राजीनामा देणे उचित ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. हा दुसरा पर्याय आता त्यांच्यासमोर उपलब्ध आहे.
( हेही वाचा: Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणीवर संध्याकाळी 5 वाजता फैसला )
5 वाजता फैसला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गुरुवारी बहुमत सिद्ध करावे, असे म्हटले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता बुधवारी 5 वाजता यावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे बुधवारी 5 वाजता ठाकरे सरकारचा फैसला होणार आहे.