राज्यातील सत्तासंघर्ष सुरुच आहे. मविआ सरकारने गुवाहाटीला गेलेल्या मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप केले. तसेच, 16 नाराज आमदारांना अपात्र ठरवण्याचाही प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंड केल्यानंतर, ठाकरे सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आता नाराज आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य समाधान सरवणकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यलयातून दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
( हेही वाचा: बंडानंतर काढलेल्या कोट्यावधींच्या जीआरची चौकशी होणार? राज्यपालांनी लिहिले मुख्य सचिवांना पत्र )
मविआ अल्पमतात
दादर माहिमचे आमदार सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल झाल्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांचे बॅनर फाडून बॅनरली काळी फिती तसेच काळेही फासले होते. सदा सरवणकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी गुवाहाटीतील नाराज आमदारांच्या तंबूत प्रवेश केल्याने, शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या राज्यातील सत्तासंघर्ष कायम असून, 36 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने मविआ सरकार अल्पमतात आले आहे.
Join Our WhatsApp Community