संजय राऊत आता गप्प बसून काय फरक पडणार आहे?

77

जगभरात बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रवक्ते संजय राऊत यांनी आपण आता बोलणार नाही असं म्हटलेलं आहे. गेली अडीच – तीन वर्षे ते केवळ बोलतंच होते. आता त्यांनी बोलण्यातून संन्यास घेतला आहे की बोलण्याचं ब्रह्मचर्य स्वीकारलंय हे त्यांचं त्यांना ठाऊक. संजय राऊतांचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाणार आहे, यात काही वाद नाही.

प्रवक्ता कसा नसावा याचा आदर्श म्हणजे संजय राऊत आहेत. राऊत इतके बोलत होते की त्यांनी शिवसेनेचे अनेक शत्रू निर्माण केले. त्यांनी कंगना राणौत या बाईला शिव्या दिल्या आणि स्वतःच मर्द म्हणवून घेतलं. संजय राऊतांनी मोदी, फडणवीस, राज्यपाल यांच्यासह आपल्या सहकार्‍यांना देखील दुखावलेलं आहे.

( हेही वाचा : 18 जुलैपासून ‘हे’ खाद्यपदार्थ महागणार)

शिवसेनेची नामुष्की करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा

अगदी स्पष्टपणे सांगायचं तर शिवसेनेची नामुष्की करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी हे सरकार २५ वर्षे चालणार आहे असं म्हटलं होतं. कदाचित २ आणि ५ च्या मध्ये ते टिंब घालायला विसरले असावेत. तर त्यांच्या बोलण्याने अनेक लोक दुखावले वर सरकारच्या अडचणी वाढवल्या. पण गंमतीचा भाग म्हणजे उद्धव ठाकरेंची यास मुक संमती होती आणि त्याहीपेक्षा गंमतीचा भाग म्हणजे ज्यांचे सहकारी त्यांना चाणक्य म्हणतात अशा शरद पवारांना देखील यात अडचण वाटली नाही. त्यांनीही राऊतांना रोखलं नाही. त्यामुळे केवळ संजय राऊतांना दोष देऊन चालणार नाही. दोष त्यांच्या ज्येष्ठांचा देखील आहे.

मग आता गप्प बसून काय उपयोग आहे?

सत्तेच्या नशेत सगळे इतके आंधळे झाले होते की आपण नेमकं काय करतोय, काय बोलतोय याचं भान कुणालाच राहिलं नाही. खरं पाहता संजय राऊत मविआ सरकारच्या मनातलं बोलत होते. म्हणूनच म्हटलं हा केवळ त्यांचा दोष नाही. आता ते बोलणार नाही असं म्हणत आहेत. पण त्यांच्यामुळे झालेलं नुकसान खूप मोठं आहे. सरकार येतात, जातात. पक्ष टिकून राहिला पाहिजे. आज संजय राऊतांनी त्यांच्या पक्षालाच ‘उखाड डाला’ या स्थिती पोहोचवलं आहे. मग आता गप्प बसून काय उपयोग आहे?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.