कामाख्या देवीच्या दर्शनानंतर शिंदेंचं मोठं विधान! म्हणाले, “आम्ही उद्या…”

87

राज्यातील सत्तासंघर्ष वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला असताना राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. गुरूवारी बहुमत चाचणी होणार असून तसे अधिकृतरित्या सर्व आमदारांना सांगण्यात आले आहे. अशातच आज बुधवारी गुवाहाटी येथे असणाऱ्या मुक्काम ठोकलेल्या सर्व बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह कामाख्या देवीचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

गुरूवारी मुंबईत येणार आहोत, आमचे सगळे आमदार उद्या मुंबईत येतील. आमच्याजवळ शिवसेनेचे ४० तर अपक्ष १० आमदार आहे. आमच्याकडे एक तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीचे टेन्शन नाही. आम्ही बहुमत चाचणीत पास होऊन विजय आमचाच आहे, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – “जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू”, गुलाबराव पाटलांचे राऊतांना चोख प्रत्युत्तर)

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार

पुढे एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असून कोणावरही बळजबरी केली नसल्याचे म्हटले असून आम्ही सगळे शिवसेनेमध्ये असल्याचा पुनरूच्चाक केला. बहुमताचा आकडा आमच्या बाजूने असल्याचा दावा देखील त्यांनी केला. आपल्या देशात बहुमताला महत्व आहे, ते बहुमत आमच्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी ३० जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे सांगितले. उद्या मुंबईत दाखल झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक भिडणार असल्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.