विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना बुडवून दाखवली

संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांसाठी व्हायरल केलेलं पत्र अतिशय बोलकं आहे. आपण का नाराज आहोत हे त्यांनी अगदी योग्य शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे. त्यांनी ’सो कॉल्ड चाणक्य कारकून बडवे’ असा शब्द प्रयोग केलेला आहे. हा शब्दप्रयोग कुणासाटी केलेला आहे हे सांगण्याची गरज नाही. लोकांमधून निवडून न येणारे हे बडवे आमच्या जीवावर राज्यसभेत, विधान परिषदेत जातात आणि आम्हाला त्यांचीच मनधरणी करावी लागते.

संजय शिरसाट यांनी उल्लेखिलेले यातले दोन प्रमुख कारकून बडवे म्हणजे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर. हे दोन असे नेते आहेत, ज्यांचा शिवसेनेला एक रुपयाचाही फायदा झालेला नाही. त्यांचे शिवसैनिकांशी चांगले काय वाईटही संबंध नाहीत. आमदार, खासदार, नगरसेवकांना ते भव देत नाहीत कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्ष करावा लागला नाही आणि उद्धव ठाकरे देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असल्याने त्यांनाही संघर्ष करावा लागला नाही. त्यामुळे त्यांनी चांगली गट्टी जमली हे विशेष.

आता माननीय बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि अर्थात बाळासाहेब असताना देखील शिवसेना आपल्या ताब्यात घेण्याच्या नादात त्यांनी अशा लोकांना जवळ केलं ज्यांचा शिवसेनेच्या जडणघडणीत शून्य वाटा होता व जनतेशी व नेत्यांशी कसच संबंध नव्हते. त्यातले मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवर असतात आणि संजय राऊत हे प्रति-शिवसेना प्रमुख म्हणून माध्यमांसमोर असतात.

’पाटणकर काढा नको’ अशी चर्चा रंगतेय

संजय राऊत यांनी गेल्या २ – ३ वर्षांत इतका मूर्खपणा केला आहे, ज्यामुळे विरोधकंच नव्हे तर त्यांचे शिवसेनाचे नेते सुद्धा वैतागले होते. आताही शिवसेनेच्या बाजूने संजय राऊत बोलत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे ह्यांच्या किती आहारी गेले असतील पाहा. दुसरा गट आहे तो उद्धव ठाकरेंच्या पत्नीच्या माहेरचा… सौ. ठाकरेंच्या माहेरच्या लोकांची लुडबुडंही लक्षणीय आहे. ही लुडबुड सामान्य जनतेच्या नजरेत देखील आलेली आहे. म्हणूनच ’पाटणकर काढा नको’ अशी चर्चा रंगतेय.

गेली अनेक वर्षे अनेक पत्रकारांनी हे लिहून झालेलं आहे की संजय राऊत हे मूळचे शरद पवरांचे खास आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत देखील शरद पवारांचेच म्हणून वावरतात. त्यांच्याच प्रयत्नाने ही महाविकास आघाडी नावाची अभद्र सत्ता स्थापन झाली आणि शिवसेनेच्या बरबादीचा इतिहास तेव्हाच लिहिला गेला. त्याचे लेखक स्वतः संजय राऊत आहेत. सत्तेचा अत्यंत माज राऊत साहेबांनी दाखवलेला आहे. माध्यमांवर स्त्रीवर्गाला आणि नेत्यांना गलिच्छ शिव्या त्यांनी दिलेल्या आहेत.

शिंदेंचं बंड हे केवळ आणि केवळ संजय राऊत आणि त्यांच्या साथीदारांमुळे झालेलं आहे. शिवसेनेला भाजप किंवा एकनाथ शिंदेंनी बुडवलं नसून, भुवया उडवणारे विश्वप्रवक्ते आदरणीय संजय राऊत साहेब यांनी बुडवलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here