महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता चार आठवडे लांबणीवर गेली आहे. 29 नोव्हेंबरला आता पुढील सुनावणी होणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडण्यात येतील तसेच कोणते वकील बाजू मांडतील याची माहितीदेखील देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
( हेही वाचा: भारताचा स्वत:चा डिजिटल रुपया आला; आता रोख रक्कम ठेवावी लागणार नाही, ‘हे’ आहेत फायदे )
‘या’ गोष्टी निश्चित करा- सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील सुनावणी सुरु करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे, असे घटनापीठाने म्हटले. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील या बाजू मांडू शकतात. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत. हे मुद्दे मोजकेच असावेत असेही न्यायालयाने म्हटले आहे. दोन्ही बाजूने कोणत्या मुद्यावर कोणते वकील युक्तीवाद करतील हेदेखील निश्चित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. जेणेकरुन युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाही. लिखित स्वरुपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community