महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारी सलग तिसऱ्या दिवसातील सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी, मंगळवारी होणार आहे. या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी, दत्ता कामत युक्तिवाद करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
The constitution bench hearings will resume on 28th February 2023.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2023
यामुळे तासभर आधीच संपलं न्यायालयाचं कामकाज
गुरुवारी नियोजित वेळेपेक्षा एक तास आधीच घटनापीठाचं कामकाज संपवलं गेलं. कारण काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्या अटकेसंदर्भातील तातडीची सुनावणी बोलावण्यात आली होती. याप्रकरणातही अभिषेक मनु सिंघवी असल्यामुळे आणि यांचं घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्यामुळे तासभर आधीच न्यायालयाचं कामकाज संपवण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात मंगळवारी २८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मंगळवारी थोडाच वेळ युक्तिवाद करणार असल्याची माहिती सिंघवी यांनी न्यायालयाला दिली आहे. माहितीनुसार, पुढील आठवड्यातही तीन दिवस सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी राखीव ठेवण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद अपूर्ण राहिला असून अभिषेक मनु सिंघवी, दत्ता कामत यांचा युक्तिवाद होणं बाकी आहे. शिवाय शिंदे गटाचा युक्तिवादही बाकी आहे. हे सर्व युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. (हेही वाचा – पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडांना घेतले ताब्यात)
Join Our WhatsApp Community