मुंबईत परतलेल्या आमदार देशमुखांचे आरोप शिंदे गटाने पुराव्यासह फेटाळले

133

महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत नेल्या जाणा-या वाहनातून पळून आल्याचा दावा करणारे, आमदार नितीन देशमुख यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत, आपबिती सांगितली. त्यानंतर पुढच्याच क्षणी एकनाथ शिंदे गटाकडून एक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. नितीन देशमुख हे सुरतच्या मार्गातून पळून आले नाहीत, तर त्यांना स्पेशल चार्टर विमानाने पाठवण्यात आले आहे, असा दावा आता एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

काय म्हणाले देशमुख 

नितीन देशमुख म्हणाले की, तोडाफोडीचे मुख्य सुत्रधार भाजपच, विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर, शिंदेसाहेबांनी बंगल्यावर बोलावले, गटनेत्याचा आदेश अंतिम असतो. मी तत्काळ बंगल्यावर गेलो, तिथे माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाशभाऊ होते. त्यांनी आम्हाला गाडीत बसवले, त्यानंतर गाडी गुजरातच्या दिशेने निघाली. पुढे सुरतला गेल्यानंतर 5 स्टार हाॅटेल होते, मोठा पोलीस बंदोबस्त होता. अनेक आयपीएस अधिकारी, जे भाजपचे गुलामगिरी करत होते. हाॅटेलमध्ये गेल्यानंतर कळाले, प्रकाश गायब झाला, त्यानंतर मी साहेबांना सांगतिले, मला इथे राहण्याची इच्छा नाही मी निघतो. मी रस्त्यात आल्यानंतर, माझ्यामागे 100 ते 150 पोलीसांचा ताफा होता, 12.30 ते 3 च्या दरम्यान रात्री मी सुसाट रस्त्यावर चालत होतो. पाऊस होता. मी शिवसेना नेत्यांशी संपर्क केला.

New Project 2022 06 23T164847.570

( हेही वाचा: शिवसेनेच्या संकटकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वार्थी कारभार! अध्यादेशांचा ‘पाऊस’ मुसळधार )

शिंदे गटाने पुराव्यासह फेटाळले आरोप 

माझे संभाषण गुजरात पोलिसांच्या लक्षात आले, वाहन थांबत नव्हते. त्या 20-25 पोलिसांनी मला लाल रंगाच्या गाडीत कोंबले. तिथे मला तिथल्या सरकारी हाॅस्पीटलमध्ये नेले. तिथे शंका आली, मला काहीही नसताना, यांनी आणले कशाला मला तपासण्याची गरज नव्हती, तरी त्यांच्या हावभावावरुन शंका निर्माण झाली. त्यात एक डाॅक्टर म्हणाला तुम्हाला हार्ट अटॅक आला. मला कळाले घातपात करण्याचा डाव आहे. कुणी हात पकडले, मान पकडली, पाय पकडले. इंजेक्शन टोचले. मला रडू आले, मला त्यावेळी माझी मुलगी आठवली, बायको आठवली.  मी गनिमीकाव्याचा वापर केला आणि माझी सुटका केली. आमदार देशमुखांनी ऐकवलेल्या या आपबीतीनंतर शिंदे गटाकडून त्यांचे चार्टर्ड विमानात बसवतानाचे फोटे जारी केले आणि पळवून नेल्याचा देशमुखांचा मुद्दा शिंदे गटाने खोडून काढला

पाटलांच्या आरोपांत तथ्य नाही 

देशमुखांसारखेच माघारी आलेले आमदार कैलास पाटील यांनी देखील शिंदे गटावर आरोप केले. त्यांच्या या आरोपानंतर आमदार तानाजी सावंत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कैलास पाटील यांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, त्यांच्या जाण्याची व्यवस्था आम्ही केली. कैलास पाटील महाराष्ट्राची, मुख्यमंत्र्यांची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत.  प्रचंड पाऊस असताना 4 कि.मी चालत आल्याचा कैलास पाटील यांनी केलेला दावा खोटा असल्याचेही सावंत म्हणाले. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी आहे.  डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावे असे सावंत म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.