राज ठाकरेंनी अ‍ॅक्टिव्ह होण्याची हीच वेळ

111

सध्या महाराष्ट्रातलं राजकारण पाहता शिवसेनेचा गड कोसळलेला आहे. आता शिवसेना रस्त्यावरची आपली ताकद दाखवणार आहे. म्हणजे कार्यालये फोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, धमकावणे, मारणे इ. गोष्टी आता सुरु झालेल्या आहेत. उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. याची कारणे देखील बाहेर येत आहेत. आता माजी आमदार आणि इतर नेत्यांनाही शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे. अशा वेळी राज ठाकरे यांनी कोणतीच कृती न करणे हे राजकीय शहाणपणाचं ठरणार नाही. हीच वेळ आहे राज ठाकरेंनी मुसद्दीपणा दाखवण्याची. शिवसेनेचा एक गट शिंदेंकडे जात असताना दुसर्‍या गटाला स्वतःकडे वळवण्याची क्षमता राज ठाकरेंमध्ये निश्चितच आहे.

अ‍ॅक्टिव्ह होण्याची हीच वेळ

आता काही महिन्यांत पालिकेची निवडणूक लागेल. त्यात जर उत्तम कामगिरी करायची असेल तर शिवसेनेच्या नगरसेवकांना संपर्क करण्याची ही नामी संधी राज ठाकरेंनी सोडू नये. उद्धव ठाकरेंवर बहुसंख्य शिवसैनिक नाराज आहेत हे उघडउघड दिसत आहे. पण आता शिंदेंचं बंड यशस्वी होईपर्यंत लगेच इतर नाराज असलेले नेते बंड करण्याचा प्रयत्न करणार नाही. जर हे बंड यशस्वी झालं तर एकेक लोक शिंदेंना येऊन मिळतील.

राज ठाकरेंचा विचार केला तर ते ठाकरे आहेत. त्यांच्यात शिवसैनिकांना बाळासाहेब दिसतात. म्हणून इतर शिवसेनेच्या नेत्यांना आकृष्ट करण्याची आणि एक चांगलं नेतृत्व दिण्याची संधी नशीबाने पुन्हा एकदा राज ठाकरेंना दिलेली आहे. प्रश्न हा आहे की त्यांना या गोष्टीचं गांभीर्य आहे का? की त्यांना केवळ शिवसेना फुटत असताना मजा बघायची आहे? जर या संधीचं त्यांनी सोनं केलं नाही तर भविष्यात हिंदुत्वाच्या राजकारणात त्यांना चांगलं स्थान मिळणार नाही.

( हेही वाचा : शरद पवार कोणाचे राजकीय करिअर वाचवण्यासाठी खेळी खेळत आहेत?)

त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांना आता आरामाची गरज आहे यात वाद नाही. परंतु पर्रीकर यांच्यासारखा नेता आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. आजारपण हे दुय्यम असतं हे पर्रीकरांनी दाखवून दिलेलं आहे. घराच्या बाहेर न पडता राज ठाकरेंना आता राजकारण खेळता येऊ शकतं. पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांना केवळ शिवसेना फुटताना मजा बघायची आहे की यातून संधी साधायची आहे?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.