मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या सत्ता संघर्षाचा गुरुवार ११ मे रोजी अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राहणार की पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. (Maharashtra Political crisis)
(हेही वाचा – Maharashtra Political crisis : अपात्रतेची टांगती तलवार; एकनाथ शिंदेंसह कोण आहेत ‘ते’ १६ आमदार? )
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political crisis) सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. एम.आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी आणि अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी युक्तिवाद केला होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत व ए.ए. तिवारी यांच्यासारख्या विधिज्ञांची तगडी फौज मैदानात उतरली होती. (Maharashtra Political crisis)
हेही पहा –
अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे
. एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री
. अब्दुल सत्तार – कृषिमंत्री
. संदीपान भुमरे – मंत्री
. तानाजी सावंत – मंत्री
. संजय शिरसाट
. यामिनी जाधव
. चिमणराव पाटील
. भरत गोगावले
. लता सोनवणे
. प्रकाश सुर्वे
. बालाजी किणीकर
. अनिल बाबर
. महेश शिंदे
. संजय रायमूलकर
. रमेश बोरणारे
. बालाजी कल्याणकर