महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ८ ते १२ मे दरम्यान लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याचा दावा केला आहे.
उज्ज्वल निकम म्हणाले….
‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाला केव्हा लागेल, हे सांगणं आज जरी कठीण असलं, तरी माझ्या मते, सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश, घटनापीठातील न्यायाधीश निवृत्त होणार आहेत, त्याच्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा आहे,’ असे उज्ज्वल निकम म्हणाले.
(हेही वाचा – शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित का नव्हता? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार चिडले अन् म्हणाले…)
राजकारणात प्रवेश करणार का?
राजकारणातील प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘राजकारणात येण्याचा माझा अजिबात विचार नाही. राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तीने राजकारणात येणे योग्य नाही. सध्या माझं मन मला सांगतंय, त्याच्यामुळे असा कोणताही विचार माझ्या मनामध्ये नाही.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community