सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाला नवे वळण लागले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (Maharashtra Politics) त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल एकतर्फी आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल करावा, असे यावर ठाकरे गटाचे म्हणणे आहे. शिवसेनेतील शिंदे आणि उद्धव गटात सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर आज, १८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाबाबतची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, तर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी पुढील दोन आठवड्यांनंतर होईल.
एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. न्यायमूर्ती बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
(हेही वाचा – ITI Trainees Tuition Payments : आयटीआय प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात ४० वर्षांनी वाढ, राज्य शासनाकडून अध्यादेश जारी )
Join Our WhatsApp Community