खरी शिवसेना नेमकी कोणाची? यावरुन आता उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाने केली आहे. तसेच, पुरावे सादर करण्यासाठी पुरासा वेळ मिळावा, अशी विनंतीदेखील ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
( हेही वाचा: ‘बेस्ट’ बसने प्रवास करताना बुक करा तुमची जागा; लवकरच सुरू होणार आरक्षण सुविधा! )
निवडणूक आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी येऊ नये. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यतचा वेळ दिला होता. त्यात पहिल्यांदाच शिंदे गटाने 4 आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आता या संदर्भात निवडणूक आयोग ठाकरे गटाला किती वेळ देते तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर, कार्यवाही किती लांबणीवर जाते ते पाहावे लागणार आहे. कारण पक्ष शेवटी कोणाचा आणि चिन्ह नेमकं कोणत्या गटाला मिळणार हे निवडणूक आयोगाच्या दारातच ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community