आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या हे सोमवारी आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केला होता. आता याच घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या चौकशीसाठी राहणार हजर
चौकशीला हजर राहण्याचे समन्स किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून बजावण्यात आले होते. त्यामुळे किरीट सोमय्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ट्राॅम्बे पोलिसातून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. पण स्व:त हजर न राहता ते वकिलांना पाठवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पिता पुत्रांना फरार घोषीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामुळे आता किरीट सोमय्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
( हेही वाचा :एसटी कर्मचा-यांना संपकाळातील वेतन नाहीच! )
राऊतांचा गंभीर आरोप
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली पैसे गोळा करण्यात आले. हे प्रकरण लहान नाही. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आता या प्रकरणात किरीट सोमय्या यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जाऊ शकतात, असेही राऊत एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community